दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत : ट्रम्प   

वॉशिंग्टन : जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केल्याची घटना घडली.  या हल्ल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले. जगभरातून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला जात आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ’एक्स’ वर पोस्ट करत या हल्लाचा निषेध केला आहे. दहशतवादी विरोधातील लढाईमध्ये अमेरिका भारताबरोबर असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 
 
ट्रम्प म्हणाले, जम्मू-काश्मीरमधून अत्यंत वेदनादायक  बातमी समोर आली असून   दहशतवादाविरोधात अमेरिका भारताबरोबर खंबीरपणे पाठीशी उभी आहे. मृतांच्या आत्म्यासाठी आणि जखमींच्या बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. पंतप्रधान मोदी आणि भारतीय नागरिकांना   आमचा पूर्ण पाठिंबा आणि सहानुभूती आहे. दरम्यान ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर रात्री दुरध्वनीवरून संवाद साधला. पंतप्रधान मोदी सद्या सौदी अरेबिया दौर्‍यावर होते. घटनेची माहिती मिळातच पंतप्रधान मोदी यांनी दौरा रद्द करत भारताकडे रवाना झाले आहेत. 

Related Articles